IPL 2025 – सलामीच्या लढतीत आरसीबी टॉसचा बॉस, प्रथम गोलंदाजीचा निर्णय

आयपीएलच्या 18 व्या हंगामाला कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर दणक्यात सुरुवात झाली आहे. सलामीच्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात सामन्याला सुरुवात झाली आहे. आरसीबीचा नवा कर्णधार रजन पाटीदार याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.