
घरच्या मैदानावर पराभवाची हॅट्रीक करणाऱ्या RCB ने दमदार पुनरागमन करत घरच्या मैदानावरच राजस्थानचा 11 धावांनी पराभव केला आहे. बंगळुरूने दिलेल्या 206 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानने कडवी झुंज दिली. यशस्वी जयसवाल (19 चेंडू 49 धावा), ध्रूव जुरेल (34 धावा) यांनी विस्फोटक अंदाजात धावांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. परंतु इतर फलंदाज टप्याटप्याने बाद होत गेल्यामुळे संघाला विजय मिळवता आला नाही. जोश हेजलवूडने फलंदाजांना मैदानावर टिकू दिले नाही. त्याने 4 विकेट घेत राजस्थानचे मनसुबे उधळून लावले आणि राजस्थानने 20 षटकांमध्ये 9 गड्यांच्या मोबदल्यात 194 धावांपर्यंतच मजल मारता आली. प्रथम फलंदाजी करतना विराटने (42 चेंडू 70 धावा) आणि देवदत्त पडीकल (27 चेंडू 50 धावा) दमदार कामगिरी करत संघाला 200 पार घेऊन जाण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली होती.