
दिल्लीने आपल्या विजयाची नॉनस्टॉप मालिका कायम राखताना फॉर्मात असलेल्या बंगळुरूचा 13 चेंडू आणि 6 विकेट राखत धुव्वा उडवला. या नॉनस्टॉप विजयासह एकही सामना न गमावता विजयी चौकार ठोकणारा आयपीएलच्या 18 व्या मोसमातला दिल्ली पहिला संघ ठरला आहे. के. एल. राहुलच्या 93 धावांच्या अभेद्य आणि घणाघाती खेळीने दिल्लीच्या विजयाची मालिका कायम राखली.
भुवनेश्वर–दयालची भन्नाट सुरुवात
दिल्लीपुढे 164 धावांचे माफक आव्हान होते, पण ते आव्हान अवघड करण्याची किमया भुवनेश्वर कुमार आणि यश दयालने केली. यशने आपल्या पहिल्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर फॅफ डय़ु प्लेसिसची विकेट काढून खळबळ माजवली तर पुढच्याच चेंडूवर जेक फ्रेझर मॅकगर्कचा अडसर दूर करत दिल्लीला दुसरा धक्का दिला. एवढेच नव्हे तर पाचव्या षटकात भुवनेश्वरने अभिषेक पोरेलचीही विकेट काढत दिल्लीची 3 बाद 30 अशी अवस्था केली.
सॉल्टने सोलून काढले
तत्पूर्वी प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळताच फिल सॉल्ट आणि विराट कोहली मैदानात उतरले आणि सॉल्टने दिल्लीच्या मिचेल स्टार्क आणि अक्षर पटेलला सोलून काढले. स्टार्कने पहिल्या षटकात केवळ 7 धावा दिल्या होत्या, मात्र पुढील तीन षटकांत 5 चौकार आणि 4 षटकार खेचत बंगळुरूला 61 धावांपर्यंत मजल मारून दिली. सॉल्टने 17 चेंडूंत 37 धावा ठोकत झंझावाती सलामी दिली, पण या झंझावातानंतर बंगळुरूच्या डावाला आघाडीचे फलंदाज आकार देऊ शकले नाही.
View this post on Instagram
गेल्या चार डावांत 67, 1, 31 आणि नाबाद 59 धावा करणाऱ्या विराट कोहलीला आज विशेष काही करता आले नाही. तो 22 धावा करून बाद झाला. कर्णधार रजत पाटीदारने 23 चेंडूंत फक्त 25 धावा केल्या, पण पडिक्कल (1), लिव्हिंगस्टोन (4) आणि जितेश शर्मा (3) यांना लवकर बाद करून दिल्लीने बंगळुरूची 6 बाद 117 अशी अवस्था करत डावावर आपली पकड केली. 17 षटकांत 125 अशी माफक मजल मारणाऱ्या बंगळुरूला 163 धावांपर्यंत पोहोचवण्याचे काम टीम डेव्हिडने 20 चेंडूंत 4 षटकार आणि 2 चौकार खेचत केले.
Sai Sudarshan – गेल, हेडचा रेकॉर्ड मोडला; विराट, रोहित जवळपासही नाही, साई सुदर्शनचा ऐतिहासिक कारनामा
राहुलची जबरदस्त खेळी
आघाडीचे 3 फलंदाज स्वस्तात बाद करत बंगळुरूने सामन्यावर पकड निर्माण केली होती. तेव्हा के. एल. राहुल संकटमोचकासारखा दिल्लीच्या मदतीसाठी धावून आला. कर्णधार अक्षर पटेलची (15) त्याला फार साथ लाभली नाही, पण त्यानंतर राहुल कुणासाठीही थांबला नाही. त्याने चौकार-षटकारांची बरसात करत बंगळुरूच्या गोलंदाजांना अक्षरशः पह्डून काढले. त्याने ट्रिस्टन स्टब्जच्या साथीने 111 धावांची भागी रचत दिल्लीला सहज आणि सोप्पा विजय मिळवून दिला. राहुलच्या 6 षटकार आणि 7 चौकारांच्या फटकेबाजीने बंगळुरूच्या आव्हानातील सारी हवाच काढून टाकली. गेल्या चार डावांत राहुलने 77, 15, ना. 34, ना. 42 अशा खेळ्या केल्यामुळे आता त्याच्या नावावर 92.50 धावांच्या सरासरीने 185 धावा आहेत. सरासरीत राहुलच्या आसपास एकही फलंदाज नाही.
चेन्नईसाठी वाईट अन् गोड बातमी, ऋतुराजच्या दुखापतीमुळे धोनीकडे नेतृत्व