
एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या CSK विरुद्ध RCB सामन्यात आरसीबीने चेन्नईचा धुव्वा उडवत 17 वर्षांचा दुष्काळ संपुष्टात आणला आहे. आरसीबीने दिलेल्या 197 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईची गाडी अक्षरश: रुळावरून घसरली. सलामीला आलेल्या रचिन रविंद्र (41 धावा) व्यतिरिक्त इतर फलंदाज स्वस्तात माघारी परतल्याने चेन्नईला 8 गड्यांच्या मोबदल्यात 146 धावांपर्यंत मजल मारता आली. या विजयासह आरसीबीने हंगामातील दुसरा विजय साजरा केला आणि 2008 नंतर चेन्नईला चेन्नईमध्येच धुळ चारण्याची किमया साधली.