IPL 2025 – टीम डेव्हिडची झुंजार खेळी व्यर्थ, पंजाबचा बंगळुरूवर 5 विकेटने दणदणीत विजय

प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूची 41 या धावसंख्येवर 6 गडी बाद झाले होते. त्यामुळे 50 चा आकडा तरी पार होणार का असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. परंतु टीम डेव्हिडने एकट्याने खिंड लढवत 26 चेंडूंमध्ये 3 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने 50 धावा करत संघाला 95 धावांपर्यंत पोहचवले. त्यामुळे पंजाबला 14 षटकांमध्ये जिंकण्यासाठी 96 धावांची आवश्यकता होती. 81 धावसंख्येवर पंजाबचा अर्धा संघ तंबुत परतला होता त्यामुळे सामन्यात थोडी रंगत निर्माण झाली होती. परंतु नेहाल वढेराने 19 चेंडूंमध्ये 33 धावा चोपून काढता सामना पंजाबच्या बाजूने झुकवला आणि जिंकला सुद्धा.