
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या पंजाब किंग्स आणि गुजरात सुपर जायंट्स या सामन्यात पंजाबने गुजरातचा 11 धावांनी पराभव केला आहे. पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने पहिल्याच सामन्यात विस्फोटक फलंदाजी करत 42 चेंडूंमध्ये 97 धावा चोपून काढल्या. अवघ्या तीन धावांनी त्याचे शतक हुकले. परंतु त्यांच्या झंझावाती खेळीमुळे पंजाबने प्रथम फलंदाजी करताना 243 धावांचा डोंगर उभा करत गुजरातला 244 धावांचे आव्हान दिले होते. गुजरातनेही दमदार फटेकबाजी करत पंजाबाने उभा केलेला डोंगर भेदण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, परंतु शेवटच्या काही षटकांमध्ये सामना पूर्णपणे पंजाबच्या बाजूने झुकला आणि पंजाबने 11 धावांनी आयपीएलमधील पहिला विजय साजरा केला.