IPL 2025 ऑरेंज कॅप कोहलीकडे

ऑरेंज आणि पर्पल कॅपसाठी तीव्र संघर्ष होणार याची कल्पना गेल्याच आठवडयात आली होती. याच ते दिसलेसुद्धा. टाकले. पण त्याच्या डोक्यावर ही ऑरेंज कॅप चार ताससुद्धा टिकली नाही. रात्र होताच विराट कोहलीने 51 धावांच्या खेळीदरम्यान सूर्याला मागे टाकत ती कॅप आपल्या डोक्यावर सजवली. आता कोहली 447 धावांसह फलंदाजीत अव्वल स्थानी विराजमान झाला आहे. याचाच अर्थ एकाच दिवसात तिघांच्या डोक्यावर ऑरेंज कॅप दिसली. मात्र उद्या ती कॅप आणखी पुणाच्याही डोक्यावर दिसू शकते. कारण अनेक फलंदाज ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आहेत. असे काहीसे दृश्य पर्पल कॅपच्या शर्यतीतही दिसणार आहे. काल बरोबरीरत असलेल्या हेझलवूडने आज दिल्लीचे दोन विकेट टिपत 18 विकेटसह पर्पल कॅप स्वताकडे खेचून आणली आहे. म्हणजे आता आयपीएलमध्ये बंगळुरूचा बोलबाला आहे. गुणतालिकेसह ऑरेंज आणि पर्पल कॅप बंगळुरू संघ आणि खेळाडूंनी आपल्याकडे आणली आहे.