
रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, ट्रेंट बोल्ट अशा दिग्गज आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा भरणा असूनसुद्धा मुंबई इंडियन्सची यंदाच्या मोसमात हाराकिरीच सुरू आहे. पाच सामन्यांत चार पराभवांसह मुंबई गुणतालिकेत आठव्या स्थानी आहे, तर दुसरीकडे दिल्लीचा संघ आत्तापर्यंत अजिंक्य राहिलेला आहे. नवोदित कर्णधार अक्षर पटेलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या दिल्लीने सुरुवातीच्या चारही सामन्यांत विजय मिळवत आपले अव्वल स्थान
कायम राखले आहे. उद्या सायंकाळी 7.30 वाजता दिल्लीचा संघ घरच्या मैदानावर मुंबईशी भिडणार असून, या सामन्यात विजय मिळवून सलग पाचवा विजय मिळवण्यासाठी सज्ज आहे, तर दुसऱ्या बाजूला मुंबई पुनरागमन करण्यासाठी तयार आहे. मात्र, तगड्या दिल्लीपुढे कमबॅक करण्याचं खडतर आव्हान मुंबई पुढे असणार आहे. त्यामुळे मुंबई दिल्लीचा विजयरथ रोखतो की, दिल्ली विजयीमालिका कायम राखते, याची उत्सुकता क्रिकेटप्रेमींना लागली आहे.