IPL 2025 – रोहित-सूर्याचा झंझावात; हैदराबादला धूळ चारत मुंबईचा विजयी चौकार

रोहित शर्माचा विस्फोटक अंदाज पाहून राजीव गांधी स्टेडियम चाहत्यांच्या जयघोषाने दणाणून गेलं. चौकार आणि षटकारांची चौफेर आतषबाजी करत रोहितने 46 चेंडूंमध्ये 8 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 70 धावांची वादळी खेळी केली. रोहित शर्मा दमदार फलंदाजी करून माघारी परतला. त्यानंतर विल जॅक्स (22 धावा) स्वस्तात बाद झाला. परंतु त्यानंतर सूर्यकुमार यादवने फक्त 19 चेंडूंमध्ये 5 चौकार आणि 2 षटकार मारत नाबाद 40 धावा करत संघाचा विजय निश्चित केला. त्यामुळे हैदराबादने दिलेले 144 धावांचे आव्हान मुंबईने 15.4 षटकांमध्येच पूर्ण केले आणि 7 विकेटने सलग चौथा सामना जिंकला. या विजयासह मुंबईने गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.