बंगळुरूविरुद्ध खेळणं भावुक  क्षण – मोहम्मद सिराज

‘आयपीएलमध्ये ज्या संघाकडून तब्बल सात वर्षे खेळलो त्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरुद्ध खेळणे, हा माझ्यासाठी एक विचित्र अन् भावुक क्षण होता. गुजरात टायटन्स संघाकडून खेळताना बंगळुरू या आपल्या जुन्या संघापुढे उभा ठाकलो तेव्हा  मनात भूतकाळातील आठवणींनी फेर धरला. मात्र एकदा खेळ सुरू झाला तेव्हा गुजरातला जिंकून देण्यासाठी सर्वस्व पणाला लावणे, हे माझे कर्तव्यच होते,’ अशी भावनिक प्रतिक्रिया वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने दिली.

‘बंगळुरूकडून खेळत असताना विराट कोहलीने मला खूप पाठिंबा दिला. मी कठीण कालखंडातून जात असताना 2018 आणि 2019 मध्ये त्याने मला साथ दिली. विराटमुळेच बंगळुरूने मला रिटेन केले होते. त्यानंतरच खऱ्या अर्थाने माझी कारकीर्द बहरली. बंगळुरूची साथ सोडणं, हा माझ्यासाठी अतिशय भावुक क्षण असल्याचे सिराज म्हणाला.