IPL 2025 – हार्दिक-तिलकची वादळी खेळी व्यर्थ, RCB ने 10 वर्षांनी “वानखेडे” जिंकलं; मुंबईचा 12 धावांनी पराभव

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चाहत्यांच्या जल्लोषात पार पडलेल्या अटीतटीच्या लढतीत बंगळुरूने मुंबईचा 12 धावांनी पराभव करत इतिहास रचला आहे. 2015 नंतर पहिल्यांदा मुंबईला वानखेडे स्टेडियमवर नमवण्याची किमया बंगुळुरूने साधली. आरसीबीने दिलेले 222 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या मुंबईनेही कडवी झुंज देत सामन्यात रंगत आणली. कर्णधार हार्दिक पंड्या (15 चेंडू 42 धावा) आणि तिलक वर्मा (29 चेंडू 56 धावा) संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. परंतु भुवनेश्वरने तिलक वर्माला आणि हॅजलवुडने हार्दिक पंड्याला बाद करत सामना पूर्णपणे आपल्या बाजूला वळवला.