MI Vs GT – हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकली, यजमान गुजरातला फलंदाजीसाठी केले आमंत्रित

IPL 2025 मध्ये मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर यजमान गुजरातचा प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरेल. आयपीएलची सुरुवात दोन्ही संघांसाठी खराब झाली आहे. मुंबईने पहिला सामना चेन्नईविरुद्ध गमावला आणि गुजरातने पहिला सामन्यात पंजाबने धुळ चारली. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे.

मुंबईचा संघ –

हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (यष्टीरक्षक), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नमन धीर, मिशेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, सत्यनारायण राजू.

गुजरातचा संघ –

शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर (यष्टीरक्षक), शाहरुख खान, राहुल तेवतिया, आर. साई किशोर, अर्शद खान, रशीद खान, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.