MI Vs GT – हार्दिक पंड्याच कमबॅक, कोणता खेळाडूचा पत्ता कट होणार? वाचा…

IPL 2025 मध्ये मुंबई इंडियन्स (MI) आणि गुजरात टायटन्स (GT) आज पहिला विजय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये विजयश्री खेचून आणण्यासाठी तुंबळ युद्ध पाहायला मिळेल. तसेच या सामन्यात अष्टपैलु खेळाडू आणि मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्या पुनरागमन करणार आहे. त्यामुळे हार्दिक पंड्याचा रुद्रावतार पाहण्यासाठी मुंबईचे चाहतेही आतुर झाले आहेत. अशातच मुंबईचा कोणता खेळाडू बाहेर बसणार असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

मुंबई इंडियन्सचा पहिला सामना चेन्नईविरुद्ध झाला. या सामन्यातही मुंबईने आपली 13 वर्षांची परंपरा कायम ठेवत सामना गमावाल. या सामन्यात सूर्यकुमार यादवने मुंबईच्या कर्णधारपदाची जबाबदारी पार पाडली होती. चेन्नईने हा सामना चार विकेटने आपल्या नावावर केला होता. संथगतीने षटके टाकल्यामुळे मुंबईच्या संघाला दंड ठोठावला होता आणि म्हणून हार्दिक पंड्यावर एक सामन्याच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे तो पहिल्या सामन्यात मैदानात उतरला नाही. परंतु आज होणाऱ्या गुजरातविरुद्धच्या सामन्यात हार्दिक मैदानात उतरून संघाला पहिला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असेल. हार्दिक पंड्याच्या पुनरागमनामुळे विकेटकीपर रॉबिन मिंजला संघातून वगळण्यात येण्याची शक्यता आहे.

चेन्नईविरुद्ध झालेल्या सामन्यात रॉबिन मिंजची बॅट तळपली नाही. अवघ्या तीन धावांवर तो बाद झाला. तसेच संघामध्ये रेयान रिकेल्टन सारखा दर्जेदार विकेटकीपर असल्यामुळे रॉबिनला गुजरातविरुद्धच्या सामन्यातून वगळले जाऊ शकते. मुंबई इंडियन्स सध्या आयपीएलच्या क्रमवारीतल 8 व्या क्रमांकावर स्थित आहे.

मुंबईचा संघ

रोहित शर्मा, रायन रिकल्टन (यष्टीरक्षक), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (कर्णधार), तिलक वर्मा, रॉबिन मिंज, नमन धीर, मिशेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, सत्यनारायण राजू, विघ्नेश पुथूर, राज बावा, अश्विनी कुमार, कॉर्बिन बॉश, कर्ण शर्मा, जसप्रीत बुमराह, रीस टोप्ले, मुजीब उर रहमान, बेव्हॉन जेकब्स, अर्जुन तेंडुलकर, कृष्णन श्रीजित.