IPL 2025 – वानखेडेवर मुंबईच्या शिलेदारांचाच दबदबा, हैदराबादला 4 विकेटने नमवलं

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या मुंबई इंडियन्सविरुद्ध (MI) सनरायझर्स हैदराबाद (SRH) सामन्यात मुंबईने हैदराबादचा अगदी सहज पराभव केला. हैदराबादने दिलेले 163 धावांचा आव्हानाचा पाठलाग मुंबईच्या शिलेदरांनी 11 चेंडू शिल्लक असतानाच पार केला. सलामीला आलेल्या रायन रिकेल्टनने ताबडतोब फलंदाजी करत 23 चेंडूत 31 धावा केल्या. रोहित शर्मा (26 धावा) लवकर माघारी परतला असला तरी, त्यानंतर आलेल्या विल जॅक्स (36 धावा), सूर्यकुमार यादव (26 धावा), हार्दिक पंड्या (21 धावा) आणि तिलक वर्मा (नाबाद 21 धावा) यांनी संयमी खेळ करत संघाच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली. विल जॅक्सने (2 विकेट आणि 36 धावा) अष्टपैलू कामगिरी करत चाहत्यांची मनं जिंकली.