IPL 2025 – 27 करोड पाण्यात; ऋषभ पंतच्या लखनऊचा पराभव, पंजाबने सलग दुसऱ्यांदा मारली बाजी

पंजाब किंग्सने आपली विजयी घोडदौड कायम ठेवत सलग दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला आहे. लखनऊविरुद्ध झालेल्या सामन्यात पंजाबने लखनऊचा 8 विकेटने पराभव केला आहे. प्रथम फलंदजी करताना लखनऊने 172 धावांचे आव्हान पंजाबला दिले होते. आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या पंजाबच्या फलंदाजांनी अक्षरश: गोलंदाजांची धुलाई करत 22 चेंडू बाकी असतनाचा सामना खिशात घातला. प्रभासिमरन सिंग (69 धावा), कर्णधार श्रेयस अय्यर (नाबाद 52 धावा) आणि नेहाल वढेरा (नाबाद 43 धावा) यांनी विस्फोटक फलंदाजी करत संघाचा विजय सोपा केला.