
सोमवारी झालेल्या लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या सामन्यात दिल्लीने शेवटच्या क्षणी सामन्याला कलाटणी दिली आणि सामना जिंकला. आशुतोष शर्माने केलेल्या वादळी खेळीमुळे दिल्लीचा विजय निश्चित झाला. या सामन्यात लखनऊच्या संघाने केलेल्या काही चुकांचा फटका त्यांना बसला तसेच शेवटच्या काही षटकांमध्ये अनुभवी गोलंदाजाची कमतरता सुद्धा जाणवली. हीच पोकळी भरुन काढण्यासाठी वेगवान गोलंदाज आवेश खानची संघात एन्ट्री होण्याची शक्यता आहे.
GT Vs PBKS – नरेंद्र मोदी स्टेडियमवर शुभमन गिलचा डंका, इतिहास रचण्याची संधी
आवेश खान दुखापतीमुळे दिल्लीविरुद्धच्या पहिल्या सामन्यात खेळू शकला नव्हता. परंतु 27 मार्च रोजी होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात खेळण्याची त्याला परवानगी देण्यात आली आहे. BCCI च्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये सोमवारी आवेश खानची शेवटची फिटनेस चाचणी पार पडली असून तो तंदुरुस्त असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे 27 मार्च रोजी सनराझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात आवेश खान खेळताना दिसण्याची शक्यता आहे.