
IPL 2025 मध्ये मुंबई इंडियन्सची सुरुवात दरवर्षीप्रमाणे खराब झाली. पहिले दोन्ही सामने गमावल्यानंतर अखेर 31 मार्च रोजी कोलकाताविरुद्ध झालेल्या तिसऱ्या सामन्यात मुबंईने हंगामातील आपला पहिला सामना जिंकला. वानखेडेवर झालेल्या या सामन्यात मुंबईचा तेज तर्रार गोलंदाज ट्रेन्ट बोल्टने एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे.
आयपीएलच्या इतिहासात ट्रेन्ट बोल्ट हा एकमेव असा गोलंदाज आहे, ज्याने पहिल्याच षटकात आपल्या धारधार गोलंदाजीच्या जोरावर सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम केला आहे. बोल्टने आयपीएलमध्ये 96 सामने खेळले असून आतापर्यंत 30 फलंदाजांना त्याने पहिल्याच षटकात आल्यापावली तंबुत धाडले आहे. या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार दुसऱ्या क्रमांकावर आहे. भुवनेश्वरने आतापर्यंत 126 सामन्यांमध्ये 27 विकेट या पहिल्याच षटकात घेतल्या आहेत. या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर प्रवीण कुमार असून त्याने 89 सामन्यांमध्ये 15 विकेट या पहिल्या षटकात घेतल्या आहेत. तसेच या क्रमवारीत चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर अनुक्रमे संदीप शर्मा (78 सामन्यांमध्ये 13 विकेट) आणि दीपक चहर (77 सामन्यांमध्ये 13 विकेट) या खेळाडूंचा समावेश आहे.
यशस्वी जैस्वालनं ‘मुंबई’ सोडली, IPL च्या मध्यावरच घेतलेल्या निर्णयामुळे क्रीडा विश्वात खळबळ
सध्याच्या घडीला आयपीएलमध्ये प्रविण कुमार व्यतिरिक्त इतर सर्व गोलंदाज आपापल्या संघांसाठी धारधार गोलंदाजी करत आहेत. दीपक चहर मुंबई इंडिन्ससाठी, संदीप शर्मा राजस्थान रॉयल्स, भुवनेश्वर कुमार बंगळुरू आणि ट्रेन्ट बोल्ट मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसत आहे. त्यामुळे पुढील काही सामन्यांमध्ये भुवनेश्वर कुमारला ट्रेन्ट बोल्टचा विक्रम मोडीत काढण्याची संधी आहे.