
दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर घरच्या चाहत्यांचा पाठिंबा असताना दिल्ली आपलं वर्चस्व गाजवणार अशी सर्वांनाच अपेक्षा होती. परंतु कोलकाताने दिलेल्या 205 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या दिल्लीला फिरकीपटूंनी ब्रेक लावला. वरुन चक्रवर्ती (2 विकेट) आणि सुनील नरेन (3 विकेट) यांनी दिल्लीचा अर्धा संघ तंबूत धाडला. फाफ डू प्लेसिस (45 चेंडू 62 धावा), कर्णधार अक्षर पटेल (23 चेंडू 43 धावा) आणि विपराज निगम (19 चेंडू 38 धावा) यांनी संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. परंतु इतर फलंदाज हजेरी लावून माघारी परतत असल्यामुळे संघाला 20 षटकांमध्ये 9 गड्यांच्या मोबदल्यात 190 धावांपर्यंत मजल मारता आली.