
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा सामना जिंकणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती. 58 धावसंख्येवर दिल्लीचे 4 गडी तंबूत परतले होते. सामना जवळपास बंगळुरुच्या बाजूने झुकलाच होता. परंतु त्यानंतर केएल राहुलने संघाची सर्व सूत्र आपल्या हाती घेतली आणि स्टेडियम दणाणून सोडलं. 53 चेंडूंमध्ये 7 चोकार आणि 6 षटकार ठोकत राहुलने आरसीबीच्या विजयाच्या आशा धुळीस मिळवल्या. त्याला ट्रिस्टन स्टब्सची (नाबाद 38 धावा) चांगली साथ मिळाली. 163 धावांच आव्हान राहुलने षटकार ठोकत 17.5 षटकांमध्ये पूर्ण केले. दिल्ली आयपीएलमध्ये सध्याच्या घडीला एकमेक संघ आहे ज्याने सलग चार सामने जिंकले आहेत.