
आयपीएल 2025 ची KKR चा मराठमोळा कर्णधार अजिंक्य रहाणेने षटकार आणि चौकारांच्या आतषबाजीने अगदी थाटात सुरुवात केली. पठ्ठ्याने 31 चेंडूंत 6 चौकार आणि 4 दणदणीत षटाकारांच्या मदतीने 56 धावा चोपून काढल्या आहेत. क्रुणाल पंड्याने त्याला बाद केलं असलं तरी अजिंक्यच्या वादाळामुळे ईडन गार्डन्सवरील चाहत्यांचा आनंद द्विगुणीत झाला.
नाणेफेक जिंकून बंगळुरूने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 16 षटकांमध्ये सहा विकेट गमावत 151 धावांवर्यंत मजल मारली आहे. केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणे (31 चेंडू 56 धावा) आणि सुनील नरेन (26 चेंडू 44 धावा) यांनी ताबडतोब फलंदाजी करत संघाचा डाव सावरला. सध्या अंगकृश रघुवंशी 19 धावा आणि रनदीप सिंह खेळत आहे. क्रुणाल पंड्याने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या असून जोश हेजलवुड, सुयश शर्मा आणि रसिख सलाम यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली आहे.