IPL 2025 – पहिलं गुडाळलं अन् मग चोपलं; CSK चा सुपडा साफ करत KKR चा मोठा विजय

महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वात मैदानात उतरलेला चेन्नईचा कोलकाताने अक्षरश: सुपडा साफ केला आहे. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईचे फलंदाजांना कोलकाताच्या गोलंदाजांनी मैदानावर टिकू दिले नाही. गोलंदाजांनी केलेल्या अचूक आणि भेदक माऱ्यापुढे चेन्नईचे फलंदाज मोठे फटके मारू शकले नाही. 79 धावांवर 9 विकेट अशी दयनीय अवस्था संघाची झाली होती. शेवटच्या षटकापर्यंत संघाला रडत रडत 103 धावांपर्यंत पोहचता आलं. सुनील नरेनने गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये आपला दम धाकवत दमदार कामगिरी केली. गोलंदाजी करताना सर्वाधिक 3 विकेट आणि फलंदाजी करताना 18 चेंडूंमध्ये 5 षटकार आणि 2 चौकार ठोकत ताबडतोब 44 धावा केल्या. त्यामुळे संघाचा विजय सोपा झाला आणि 10.1 षटकात कोलकाताने सामना 8 विकेटने खिशात घातला.