
जोस बटलरने धुवाँधार फलंदाजी करत गुजरातला विजय मिळवून देण्यात खारीचा वाटा उचलला आहे. चिन्नास्वामी स्टेडियमवर पार पडलेल्या या अटीतटीच्या लढतीत बंगळुरूने गुजरातला 170 धावांचे आव्हान दिले होते. आव्हानाच पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या गुजरातने आक्रमक सुरुवात करत तोडफोड फटकेबाजी केली. कर्णधार शुममन गिल व्यतिरिक्त सर्वच फलंदाज बंगळुरूच्या गोलंदाजांवर चांगलेच बरसले. साई सुदर्शनने 49 धावांची सलामी देत विजयाचा पाया रचला. त्यानंतर आलेल्या बटलरने 39 चेंडूंमध्ये 6 खणखणीत षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने नाबाद 73 धावा चोपून काढल्या. बटलरला रूदरफोर्डची चांगली साथ मिळाली त्यानेही हात धुवून घेत 18 चेंडूंमध्ये 3 षटकार 1 चौकार मारत 30 धावांची वादळी खेळी केली.