
इंग्लंडचा विस्फोटक फलंदाज हॅरी ब्रुकला ऐन वेळेस आयपीएलमधून माघार घेणं चांगलच महागात पडलं आहे. नवीन नियमांनुसार BCCI ने कारवाई करत त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घातली आहे. बीसीसीआयने यासंदर्भात इंग्लंड क्रिकेट बोर्डाला कळवले आहे. त्यामुळे पुढील दोन वर्ष हॅरी ब्रुक आयपीएलच्या लिलाव प्रक्रियेत भाग घेऊ शकणार नाही.
नवीन नियमांनुसार, जे खेळाडू आयपीएलच्या लिलाव प्रक्रियेत भाग घेतात आणि ज्यांना विकत घेतलं जात. असे खेळाडू जर स्पर्धा सुरू होण्यापूर्वी खेळण्यास उपलब्ध होत नसतील, तर त्यांच्यावर दोन वर्षांची बंदी घातली जाते. याच नियमांनुसार हॅरी ब्रुकवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. हॅरी ब्रुकला दिल्ली कॅपिटल्सने 6.25 कोटी रुपयांची बोली लावत खरेदी केले होते. खेळावर जास्त लक्ष देऊन राष्ट्रीय संघासाठी वचनबद्ध असल्याचे सांगत त्याने आयपीएलमधून माघार घेतली आहे.