IPL 2025 – सामना हातचा गेला, पण हार्दिक पंड्याने इतिहास रचला; अनिल कुंबळेचा 16 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडला

मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स संघात शनिवारी अटलबिहारी वाजपेयी मैदानावर रोमहर्षक सामना झाला. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या लढतीत यजमान लखनऊने 12 धावांनी विजय मिळवला. यंदाच्या हंगामातील मुंबईचा हा तिसरा पराभव ठरला. यामुळे मुंबईचा संघ सातव्या स्थानावर फेकला गेला आहे. पण सामना जरी मुंबईने गमावला असला तरी मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने इतिहासा रचला आहे. पंड्याने अनिल कुंबळेचा 16 वर्षांपूर्वी विक्रम ध्वस्त केला.

इंडियन प्रीमियर लीगमध्ये फाइव्ह विकेट हॉल घेणारा हार्दिक पंड्या पहिला कर्णधार ठरला आहे. पंड्याने अनिल कुंबळेचा 16 वर्षापूर्वी विक्रम ध्वस्त करत इतिहास रचला आहे. लखनऊविरुद्ध खेळताना पंड्याने 4 षटकात 36 धावा देत 5 विकेट्स घेतल्या.

हे वाचा – ठुकरा के मेरा प्यार… इकडं ‘मियां मॅजिक’नं RCB ची झोप उडवली, तिकडं मिम्सचा पाऊस पडला; GT नंही हात धुवून घेतला

याआधी कर्णधार म्हणून खेळताना अनिल कुंबळेने 4 षटकात 16 धावा देत 4 विकेट्स घेतल्या होत्या. त्यावेळी कुंबळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा कर्णधार होता. जोहान्सबर्गमध्ये हा सामना झाला होता. तसेच 2010 मध्येही कुंबळेने 4 विकेट्स घेण्याचा कारनामा केला होता. आयपीएलच्या तिसऱ्या हंगामात कुंबळने नवी मुंबईतील डी. वाय. पाटील मैदानावर डेक्कन चार्जर्स संघाविरुद्ध खेळातना 3.3 षटकात 16 धावा देऊन 4 विकेट्स घेतल्या होत्या. मात्र आजपर्यंत कोणत्याही कर्णधाराला 5 विकेट्स घेता आल्या नव्हता. पण आता पंड्याने हा कारनामा करून दाखवला आहे.

जे.पी. ड्यूमिनी, शेन वॉर्न, युवराज सिंह यांनीही कर्णधार असताना चार विकेट्स घेण्याची कामगिरी केलेली आहे. तर याआधी हार्दिकची कर्णधार म्हणून 4 षटकात 31 धावा आणि 3 विकेट्स ही सर्वोत्तम कामगिरी होती. मुंबईतील वानखेडे मैदानावर सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध खेळताना त्याने या कामगिरीची नोंद केली होती.

दरम्यान, आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून खेळताना सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत हार्दिक दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने आतापर्यंत 30 विकेट्स घेतल्या आहेत. या यादीत दिवंगत खेळाडू शेन वॉर्न पहिल्या स्थानावर असून त्याच्या नावावर 57 विकेट्सची नोंद आहे. अनिल कुंबळे 30, आर. अश्विन 25 आणि पॅट कमिन्स 21 अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत.

बुमराचे पुनरागमन लांबणीवर