
गुणतालीकेत दुसर्या स्थानी असलेला दिल्लीचा संघ उद्या तळातल्या राजस्थानशी घरच्या मैदानावर भिडणार आहे. सलग तीन सामन्यांत विजय मिळवून दणक्यात सुरूवात करणार्या दिल्लीचा विजयरथ मुंबईने रोखला होता. त्यामुळे उद्याच्या सामन्यात राजस्थानला पराभूत करून पुन्हा एकदा विजयाचा सूर आळवण्यासाठी दिल्लीचा संघ उत्सुक असेल. तर, प्ले ऑफच्या शर्यतीत आपले आव्हान टिकवण्यासाठी राजस्थानला धडपड करावी लागणार आहे. कर्णधार अक्षर पटेलच्या नेतृत्वात दिल्लीचा संघ उत्तम कामगिरी करत आहे. आतापर्यंत खेळलेल्या चार सामन्यांमध्ये सुरूवातीच्या तीन सामन्यात विजय मिळवून दिल्लीने दणक्यात सुरूवात केली होती.