
दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबादवर 7 गडी राखून विजय मिळवला आहे. हा सामना विशाखापट्टणम येथील डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए स्टेडियमवर खेळला गेला. सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 163 धावा केल्या. मात्र दिल्ली कॅपिटल्सने हे लक्ष्य अवघ्या 16 षटकांत गाठले. दिल्ली कॅपिटल्सने सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला आहे.
सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र त्यांचा हा निर्णय अ यशस्वी ठरला. अनिकेत वर्माने 41 चेंडूत 74 धावांची शानदार खेळी खेळली. परंतु दिल्लीचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने 5 बळी घेत सनरायझर्सला हादरा दिला. सनरायझर्सची संपूर्ण टीम 163 धावांवरच गारद झाली.
प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सकडून फाफ डु प्लेसिसने 27 चेंडूत 50 धावांची आक्रमक खेळी केली. तर अभिषेक पोरेल (18 चेंडूत 34*) आणि ट्रिस्टन स्टब्स (14 चेंडूत 21*) यांनी नाबाद राहून विजय निश्चित केला. सनरायझर्सकडून झीशान अन्सारीने 3 बळी घेतले. मात्र तरीही त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.