
“करो या मरो”च्या लढतीत अखेर चेन्नईने लखनौचा 5 विकेटने पराभव करत प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याच्या आशा पल्लवीत ठेवल्या आहेत. लखनौने दिलेले 167 धावांचे आव्हान पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात चांगली झाली. परंतु मधली फली कोलमडल्यामुळे सामना हातून निसटण्याची शक्यता निर्माण झाली होती. परंतु शिवम दुबे (43 धावा) आणि कर्णधार महेंद्र सिंग धोनी (26 धावा) यांनी डाव सावरत सामना आपल्या खिशात घातला. सलग पाच सामने गमावल्यामुळे चेन्नईचा खेळ संपुष्टात येतो का, अशी भीती चाहत्यांमध्ये निर्माण झाली होती. परंतु आजचा सामना जिंकल्यामुळे चेन्नई पुन्हा एकदा प्ले ऑफच्या शर्यतीत परतली आहे.