IPL 2025, KKR vs RCB – रोमहर्षक सामन्यात RCB चा विजय; 7 गडी राखत KKR वर केली मात

IPL 2025 चा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) यांच्यात झाला. हा सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर रंगला आहे. या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सने 8 गडी बाद 174 धावा केल्या. कोलकाता संघाने आरसीबीला विजयासाठी 175 धावांचे लक्ष्य दिले आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीने धडाकेबाज कामगिरी करत 13.2 षटकांत 2 गडी गमावून 134 धावा करत विजयाच्या दिशेने कूच केले आहे. या सामन्यात RCB ने 7 गडी राखत KKR वर मात केली आहे.

लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीची सुरुवात चांगली झाली. विराट कोहली आणि फिल सॉल्ट यांनी मिळून केकेआरच्या गोलंदाजांची धुलाई केली. दोघांनी 51 चेंडूत 95 धावांची भागीदारी झाली. सॉल्टने फक्त 25 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. 56 धावा काढल्यानंतर वरुण चक्रवर्तीच्या चेंडूवर सॉल्टला स्पेन्सर जॉन्सनने झेलबाद केले. साल्टने 31 चेंडूंच्या खेळीत 9 चौकार आणि दोन षटकार त्याने ठोकले. आरसीबीकडून विराट कोहलीने नाबाद 59 धावा केल्या.