
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या समारोपानंतर आता क्रीडाप्रेमींना जगातील सर्वात मोठी लीग अर्थात इंडियन प्रीमियर लीगचे वेध लागले आहेत. आयपीएलच्या नव्या हंगामाला 22 मार्च पासून सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी आयपीएल फ्रेंचाईजींनी माहोल तयार करायला सुरुवात केली आहे. आयपीएलचे हटके कॅम्पेन सध्या सुरू असून वेगवेगळे संघ रोज आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून क्रिएटिव्ह व्हिडिओ शेअर करत आहेत. याला क्रीडाप्रेमींचा ही चांगला प्रतिसाद मिळत असून अवघ्या काही तासांमध्ये या व्हिडिओंना मिलिअन्समध्ये व्ह्युज मिळतायेत.
आयपीएलची ट्रॉफी पाच वेळा जिंकलेल्या मुंबई इंडियन्स कडूनही हटके व्हिडिओ शेअर केले जात आहेत. नुकताच मुंबई इंडियन्सने एक नवा व्हिडिओ शेअर केला असून यात बॉलिवूडचा भिडू अर्थात जॅकी श्रॉफ हा मुंबईच्या खेळाडूंसोबत दिसतोय.
View this post on Instagram
दुसरीकडे गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने एक हटके व्हिडिओ शेअर केला आहे. आयपीएलचा पहिलाच सामना केकेआर आणि आरसीबी संघात खेळला जाणार आहे. यंदा कोलकाताच्या संघाचे नेतृत्व मराठमोळा अजिंक्य रहाणे करत आहे. त्यानेही सरावाची सुरुवात करण्यापूर्वी स्टंप ची पूजा केली आणि मैदानात उतरला. याचा व्हिडिओ केकेआरने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे.
View this post on Instagram
लखनऊ सुपर जायंट्स एक गल्ली क्रिकेट स्टाइल व्हिडिओ शेअर केला आहे. सराव करताना चेंडू नेटच्या वरच्या भागांमध्ये अडकतो आणि तो काढण्यासाठी खेळाडू आणि संघ व्यवस्थापनातील इतर सदस्य कशी कसरत करतात हे यात दाखवण्यात आले आहे. असे अनेक मजेशीर व्हिडिओ प्रत्येक संघ शेअर करत असून यामुळे आयपीएलच्या नव्या हंगामाचा माहोल तयार होण्यास मदत मिळत आहे.
View this post on Instagram