IPL 2025 – गोलंदाजांची धार दिसणार अन् फलंदाजांची तारांबळ उडणार, BCCI ने घेतला मोठा निर्णय

आयपीएलची आतषबाजी दोन दिवसांनी म्हणजेच 22 मार्च पासून सुरू होणार आहे. त्यामुळे चाहत्यांची प्रतीक्षा आता शिगेला पोहोचली असून चौकार आणि षटकारांचा धमाका पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये खेळला जाणार आहे. आयपीएलचा 18 वा हंगाम सुरू होण्यापूर्वी BCCI ने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गोलंदाजांची धारधार गोलंदाजी चाहत्यांना पाहता येणार आहे.

कोविड-19 महामारीच्या काळात ICC ने खेळाडूंच्या सुरक्षेसाठी काही कठोर नियमांची अंमलबजावणी केली होती. यानुसार चेंडूवर थुंकी लावण्यास बंदी घातली होती. हाच नियम आयपीएलमध्येही लागू करण्यात आला होता. हाच नियम आजपर्यंत कायम होता. याच नियमावरून बीसीसीआयने आयपीएलचा 18 वा हंगाम सुरू होण्यापूर्वी मुंबईमध्ये सर्व संघांच्या कर्णधारांची मीटिंग घेतली. या मीटिंगमध्ये चेंडूला थुंकी लावण्याच्या नियमावर चर्चा करण्यात आली. बऱ्यापैकी संघांच्या कर्णधारांनी चेंडूवर लावण्यात येणाऱ्या थुंकीवरील बंदी उठवण्यात यावी यास सहमती दर्शवली. त्यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये गोलंदाजांना चेंडूवर थुंकी लावण्यास अनुमती देण्यात आली आहे. त्यामुळे गोलंदाजांना याचा चांगलाच फायदा होणार आहे. तसेच असा निर्णय घेणारी आयपीएल जगातील पहिलीच लीग ठरली आहे.

IPL 2025 – राजस्थान रॉयल्सनं अचानक कर्णधार बदलला; रियान परागकडं नेतृत्व, नेमकं कारण काय?

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीने चेंडूला थुंकी लावण्यावर घालण्यात आलेल्या बंदी विरोधात आवाज उठवला होता. त्याने ही बंदी उठवण्यात यावी, अशी मागणी केली होती. कारण याचा फक्त फंलदाजांनाच फायदा होतो.  तो म्हणला होता की, आम्ही चेंडूला थुंकी लावण्याची मागणी यासाठी करत आहोत की, यामुळे चेंडूला रिव्हर्स स्विंग करण्यास मदत मिळते, असे शामी म्हणाला होता.

बीसीसीआयनं तिजोरी उघडली, टीम इंडियाचे चॅम्पियन्स खेळाडू मालामाल होणार, ‘इतक्या’ कोटींचं बक्षीस जाहीर