आयपीएल राऊंडअप – आवेश खान येतोय…

लखनौ सुपर जायंट्सला आपल्या सलामीच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून हार सहन करावी लागली असली तरी आता त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आलीय. त्यांचा प्रमुख वेगवान गोलंदाज आवेश खानला बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने आयपीएलमध्ये गोलंदाजी करण्याची परवानगी दिली आहे. त्याच्या उजव्या गुडघ्याला काहीसा त्रास जाणवत होता. मात्र आता तो पूर्णपणे बरा झाला आहे. या कारणामुळे त्याला आयपीएलच्या सुरुवातीच्या काही सामन्यांपासून दूर ठेवण्यात आले होते. आता त्याच्या फिटनेसची पुन्हा चाचणी घेण्यात आली असून तो लखनौ संघात दाखल होण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र तो कोणत्या सामन्यात पुनरागमन करणार याबाबत संघव्यवस्थापनाकडून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. येत्या 27 मार्चला त्यांची हैदराबादशी गाठ पडणार आहे.

आशुतोषचा पुरस्कार गुरू धवनला अर्पण

विशाखापट्टणम – 66 धावांची अद्भुत खेळी करत दिल्लीला धमाकेदार विजय मिळवून देणाऱया आशुतोष शर्माने आपला सामनावीराचा बहुमान आपला गुरू शिखर धवनला अर्पण केला आहे.  त्याच्या या क्षणाला संस्मरणीय बनविण्यासाठी शिखर धवनने व्हिडीओ कॉल केला. गेल्या मोसमात आशुतोष हा शिखरच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्जसाठी खेळला होता. शिखरच आशुतोषचा गुरू होता. मार्गदर्शक होता. त्याच्या पाठिंब्यामुळेच मी माझ्या कारकीर्दीला घडवू शकल्याचे सांगत धवनबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यामुळे आपल्या या पुरस्काराला त्याने आपल्या गुरु धवन यांना अपर्ण केले. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेल्या आशुतोष शर्माने 31 चेंडूंत 66 धावांची झंझावाती खेळी करताना त्याने 5-5 षटकार-चौकार लगावले.

आयपीएल गुणतालिका

संघ       सा.    वि.     .       गुण               नेररे

हैदराबाद    1  1  0   2        2.200

बंगळुरू   1   1  0  2      2.137

पंजाब    1   1  0  2      0.550

चेन्नई     1   1  0  2      0.493

दिल्ली   1   1  0  2      0.371        

लखनौ    1   0  1  0   – 0.371        

मुंबई     1   0  1  0   – 0.493

गुजरात  1   0  1  0   – 0.550

कोलकाता    1  0  1   0 –      2.137

राजस्थान    1  0  1   0 –      2.200