
IPL 2025 च्या 19 व्या सामन्यात हैदराबादच्या विस्फोटक फलंदाजांना चारीमुंड्या चित करत गुजरातने 7 विकेटने विजय संपादित केला आणि विजयाची हॅट्रीक साजरी केली. दुसरीकडे पहिल्या सामन्यात धावांचा पाऊस पाडणाऱ्या हैदराबादला सलग चौथ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात दोन वेळा दंडीत करण्यात आलेल्या दिग्वेश राठी काहीसा शांत होता. परंतु वेगवान गोलंदाज इशांत शर्माने असं काही केलं की, BCCI ला त्याला दंडीत करावं लागलं.
गुजरात टायटन्सता अनुभवी वेगवान गोलंदाज इंशात शर्माला BCCI ने दंडीत केले आहे. इशांत शर्माला हैदराबादविरुद्ध झालेल्या सामन्यात आयपीएलच्या आचारसंहीतेचे उल्लंघन केल्याप्रकरणी मॅच फीच्या 25 टक्के इतका दंड ठोठावण्यात आला आहे. त्याचबरोबर त्याच्या खात्यात एका डिमेरिट पॉइंटची सुद्धा भर घालण्यात आली आहे. इशांत शर्माने कलम 2.2 अतंर्गत लेव्हल-1 चा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. परंतु त्याने नेमकी चुक काय केली हे समजू शकलेले नाही. परंतु कलम 2.2 मध्ये समाविष्ट नियमांनुसार, जर एखाद्या खेळाडूने मैदानावर स्टंम्पला लाथ मारली, जाहीरात बोर्ड फोडला, ड्रेसिंग रुमचे दरवाजे आदळले, आरशांवर रागल काढला किंवा खिडक्यांना नुकसान पोहचवले, तर संबंधित खेळाडूला कलम 2.2 अंतर्गत दंडीत केले जाते. याप्रकरणी पंचांचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असतो.