ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे आयफोन महागणार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरात टॅरिफ लावला आहे. यामध्ये सर्वात जास्त टॅरिफ चीनवर लावण्यात आल्याने आयफोनच्या किमती वाढणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आयफोनची निर्मिती सर्वात जास्त चीनमधून केली जाते, परंतु अमेरिकेने चीनवर तब्बल 54 टक्के टॅरिफ लावला आहे. त्यामुळे आता जास्तीचा वाढलेला खर्च अ‍ॅपल स्वतः सोसणार की, तो ग्राहकांच्या माथी मारणार हे लवकरच स्पष्ट होईल. जर अ‍ॅपलने वाढलेल्या किमती ग्राहकांच्या माथी मारल्यास ग्राहकांना आयफोन खरेदीसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागतील. अ‍ॅपल कंपनी दरवर्षी 22 कोटींहून अधिक आयफोनची विक्री करते. यामध्ये अमेरिका, चीन, हिंदुस्थान आणि युरोपमध्ये आयफोनचा सर्वात जास्त ग्राहकवर्ग आहे.