एप्रिलमध्ये आयफोनला मिळणार नवीन ‘एआय फिचर’

अॅपलने आपल्या आगामी आयफोन अपडेट आयओएस 18.4 च्या रिलीज टाइमलाइनची घोषणा केली. हे अपडेट आयफोमध्ये एप्रिलमध्ये मिळणार आहे. नवीन आर्टिफिशियल इंटेलिजेन्स (एआय) फिचरसोबत अनेक भाषांसाठी अॅपल इंटेलिजन्सचा सपोर्ट देणार आहे. यात चिनी, इंग्रजी (हिंदुस्थान, सिंगापूर), फ्रान्स, जर्मनी, इटालियन, जपानी, कोरियन, पोर्तुगाल आणि स्पॅनिश भाषेला सपोर्ट मिळणार आहे.

आयओएस 18.4 मध्ये एक स्मार्ट सिरी दिसणार आहे. या नव्या एआय फिचर्समुळे आयफोन युजर्सचा अनुभव आणखी चांगला होईल. अॅपलने नुकताच आयफोन 16 ई हा नवीन फोन लाँच केला आहे. हा फोन आतापर्यंतचा सर्वात स्वस्त आयफोन असल्याचा दावा केला जात आहे. या फोनमध्ये 48 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे.