Apple चा सर्वात स्वस्त iPhone लॉन्च, मिळणार जबरदस्त कॅमेरा आणि फीचर्स; जाणून घ्या किंमत

Apple ने आपल्या iPhone 16 सिरिजचा एक नवीन स्मार्टफोन iPhone 16e लॉन्च केला आहे. यात कंपनीने जबरदस्त फीचर्स दिले आहेत. जो हा फोन नवीन A18 चिपसह येईल. Apple चा पहिला सेल्युलर मॉडेम C1 iPhone 16e Apple Intelligence सह डिझाइन केलेला आहे. जो युजर्सला AI चा चांगला अनुभव देतो. हा कंपनीचा सर्वात स्वस्त फोन आहे. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ…

डिझाइन आणि बॅटरी

या नवीन फोनमध्ये 6.1-इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले देण्यात आला आहे. जो OLED तंत्रज्ञानासह येतो. iPhone 16e ला IP68 रेटिंग मिळाली आहे, ज्यामुळे पाणी आणि धूळ पासून हा संरक्षित आहे.

Apple चा दावा आहे की iPhone 16e मध्ये सर्वात जास्त काळ टिकणारी बॅटरी देण्यात आली, जी iPhone 11 पेक्षा 6 तास जास्त आणि सर्व iPhone SE मॉडेल्सपेक्षा 12 तास जास्त टिकते. ही वायरलेस चार्जिंग आणि USB-C पोर्टसह येते.

कॅमेरा

iPhone 16e मध्ये 48MP फ्यूजन कॅमेरा आहे, ज्यामध्ये 2x टेलीफोटो लेन्स देखील आहे. यात नाईट मोड, पोर्ट्रेट मोड आणि एचडीआर तंत्रज्ञान आहे. याशिवाय यात 4K डॉल्बी व्हिजनमध्ये व्हिडीओ रेकॉर्डिंगची सुविधा डिव्हाइसमध्ये देण्यात आली आहे.

किंमत किती?

iPhone 16e हा दोन मॅट रंग पर्यायांमध्ये उपलब्ध असेल – ब्लॅक अँड व्हाईट. हा फोन 128 जीबी, 256 जीबी आणि 512 जीबी अशा तीन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येईल. याच्या 128 जीबी व्हेरिएंटची किंमत 59,900 रुपये, 256 जीबी व्हेरिएंटची किंमत 69,900 रुपये आणि 512 जीबी व्हेरिएंटची किंमत 89,900 रुपये आहे. त्याची प्री-ऑर्डर 21 फेब्रुवारीपासून सुरू होईल आणि फोन 28 फेब्रुवारीपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.