हिंदुस्थानात iPhone 16 सीरिज आल्यानंतर शुक्रवारी मुंबई आणि दिल्लीतील अॅपल स्टोअरमध्ये iPhone खरेदी करणाऱ्यांची रांग लागली होती.
मुंबईतील बीकेसी भागामध्ये अॅपलचे स्टोअर आहे. हिंदुस्थानमधील हे पहिले स्टोअर असून येथे शुक्रवार सकाळपासून आयफोन-16 खरेदी करण्यासाठी नागरिकांनी रांग लावली होती. राज्यातील विविध भागांमधून आयफोनप्रेमी मुंबईत दाखल झाले होते.
Apple ने हिंदुस्थानात आपले अस्तित्व वाढण्याचे संकेत असल्याचे म्हटले आहे. अॅपल कंपनीने दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी विक्रीमध्ये वाढ झाली असल्याचे सांगितले.