
कोंबड्यांचा ‘गुलियन बॅरी सिंड्रोम’ या आजाराच्या प्रादुर्भावाशी संबंध असण्याची शक्यता पडताळून पाहण्याचे केंद्र व राज्य शासनाचे निर्देश होते. त्यानुसार खडकवासला धरणाच्या नजीकच्या लोकवस्त्यांमधील पाळीव कोंबड्या आणि पोल्ट्री फार्ममधील पक्ष्यांचे क्लोकल स्वॅब, विष्ठा नमुने, पाण्याचे नमुने संकलित करून नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, पुणे या संस्थेस परीक्षणासाठी सादर करून तपासणीची कार्यवाही पशुसंवर्धन विभागाने सुरू केली आहे.
पुण्यात खडकवासला धरणाच्या नजीकच्या लोकवस्त्यांमध्ये गुलियन बॅरी सिंड्रोमच्या प्रादुर्भावाच्या पाश्र्वभूमीवर या आजारास कारणीभूत घटकांमध्ये कुक्कुट पक्ष्यांचा समावेश असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर नमुने तपासणीचा निर्णय घेतल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी दिली.
पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने बाधित क्षेत्रालगत पाण्याचे मुख्य स्रोत असलेल्या खडकवासला धरणाच्या भागातील ११ कुक्कुट प्रक्षेत्रांना भेट दिली. या प्रक्षेत्रांमध्ये विविध समूहाचे ६ अंडी देण्यासाठी कुक्कुट पक्षी, संगोपन करणारे प्रक्षेत्र आणि ५ व्यक्तिगत मांसल कुक्कुट पालन प्रक्षेत्र आहेत. वेंकटेश्वरा समूहाचे कुक्कुट पालन प्रक्षेत्रावर जैवसुरक्षा पालन करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, पुणे या संस्थेकडून प्राप्त झालेल्या तपासणी अहवालानुसार एकूण १०६ नमुन्यांपैकी क्लोकल स्वॅब ८९ व कुक्कुट विष्ठा १७ तसेच नमुने (९ प्रक्षेत्रावरील २ कुक्कुट विष्ठा आणि २२ क्लोकल स्वॅब नमुने) कंम्पायलोबॅक्टर जेजूनाय या जिवाणूसाठी पॉझिटिव्ह आलेले आहेत. एका प्रक्षेत्रावरील ५ नमुने । नोरोव्हायरससाठी निगेटिव्ह आलेले आहेत
कुक्कुट पक्ष्यांच्या आतड्यांमध्ये कंम्पायलो बॅक्टर जेजूनाय हा सामान्यतः अस्तित्वात असणारा जिवाणू आहे. तसेच हा जिवाणू इतर प्राणी व मानवातही आढळतो. ही शास्त्रोक्त माहिती आहे. परिक्षेत्रातील कुक्कुट प्रक्षेत्रावरील सांडपाणी अथवा विष्ठा नजीकच्या पाणी | स्रोतात मिसळल्याने कुक्कुट पक्ष्यांपासून जीबीएस पसरत असल्याचे वृत्त चुकीचे आहे. मात्र, यामुळे कुक्कुट पालकांच्या व्यवसायावर विपरित परिणाम झाला असून, नागरिकांमध्येही संभ्रम आहे.
– डॉ. प्रवीणकुमार देवरे, पशुसंवर्धन