>> पूजा सामंत
केबीसी हे 25 वर्षांचे एक अद्भुत पर्व ठरलं. पण मला असं वाटतं, माझ्या निराशेच्या क्षणांनीदेखील मला पुन्हा उठून उभं राहण्याची शक्ती दिली. या प्रसंगाने मला शिकवलं. रसिक प्रेम करतात, पण त्यांच्या हृदयातून पायउतार होण्यास क्षणाचा विलंब लागत नाही याचा अनुभवही मी घेतला. अशा पार्श्वभूमीवर त्याच सर्वसामान्य मायबाप प्रेक्षकांना मी दर रविवारी प्रेमाने सामोरा जातो. त्यांना माझ्या घराच्या आवारात उभं राहून नमस्कार करतो. त्यांचे आशीर्वाद-प्रेम घेतो! माझ्यासोबत ही प्रेमाची ज्योत कायम तेवणारी आहे. माझं नैतिक मनोबल वाआहे.
घता बघता 2024 चा सूर्य अस्तास गेला आणि 2025 चा अरुणोदय झाला आहे. माझ्याही वयाची ब्याऐंशी वर्षे पूर्ण झालीत, पण खरं म्हणजे वाया वयाचा विचार मी करत नाही, पण माझ्या वयाची आठवण अगदी सहजपणे केबीसी (कौन बनेगा करोडपती) शोमध्ये सहभागी होणारे स्पर्धक करून देतात. अर्थात त्यांचं म्हणणं असतं, माझं वय (82) होऊनही मी अनेक तास कसा काम करू शकतो? माझ्या अखंड ऊर्जेचा स्त्राsत कोणता? त्यांनी अगदी उत्सुकतेपोटी, कुतूहलापोटी केलेला प्रश्न माझ्या कानांवर येतो जे स्वाभाविक आहे. त्यात माझ्या वयाची जाणीव होत राहते, पण ती मी तिथेच सोडून देतो, कारण वावय माझ्यासाठी अकारण तणाव निर्माण करून ठेवतं. माझा कामातील उत्साह निघून जातो. Agा ग्s रल्st a हल्स्ंाr! असं आपण अनेकदा म्हणतो, पण ही वृत्ती आहे वयाकडे दुर्लक्ष करत काम करत राहण्याची. माझी तब्येत शंभर टक्के निरोगी आहे असंही नाही, पण शरीराच्या किरकोळ तक्रारींकडे लक्ष देणं म्हणजे शरीराचे चोचले पुरवणं, अति लाड करणं असं माझं प्रामाणिक मत आहे.
माझ्या वयाची आठवण आणि आजार यावरून आठवण झाली ती 1982 मध्ये मला झालेला ‘कुली’ चित्रपटाच्या सेटवरचा जीवघेणा अपघाताची! तो अपघात माझ्यासाठी जीवन-मरणाचा म्हणण्यापेक्षा मरणाचा प्रश्न निर्माण करून गेला. माझ्या शरीरात रक्तस्त्राव झाल्याने रक्ताची तूट भरून कायासाठी अनेकांनी माझ्यासाठी रक्तदान केले. माझा जीव वाचवला. त्यांचे माझ्यावर कायमचे ऋण आहेत. करोडो देशवासियांनी, माझ्या कुटुंबाने, माझ्यासाठी केलेल्या प्रार्थनांमुळे माझा प्राण वाचला. अन्यथा मला गंभीर आजारपण आलं नाही कधी. माझ्या चाहत्यांच्या प्रेमामुळे मी वाचलो आणि तेव्हापासून सतत काम करत राहिलो. आजही ‘कौन बनेगा करोडपती’ या रिआलिटी शोसाठी मी दिवसाचे 12 तास चित्रण करतोच आहे. या कार्यक्रमात उपस्थित राहणारा प्रेक्षकवर्ग मला इतक्या प्रेमाने ‘चिअर अप’ करतो की त्यांचा उत्साह, त्यांनी केलेलं स्वागत, त्यांचा पाठिंबा मला कामासाठी दहा हत्तीचं बळ देतो. काम करण्यासाठी नवी ऊर्जा या सगळ्यांमुळे लाभते. माझ्या कुटुंबात मात्र मी हा शो यापुहोस्ट करू नये, असं आग्रही मत आहे. अर्थात या कार्यक्रमाचं होस्टिंग करताना तरुणांना लाजवेल अशी ऊर्जा आवश्यक असते. अखंड बोलणं गरजेचं असतं, बोलण्यात, चालण्यात, वागण्यात सुसूत्रता, ऊर्जा-आत्मियता असणं आवश्यक आहे आणि मी अतिश्रम करू नये असं अभिषेक-श्वेता-जया यांचं एकमत आहे. त्यामुळे आरंभी हा शो द्विधा मनस्थितीच तेव्हा स्वीकारला होता. पण नंतर या शोचे संचालन म्हणजे माझ्यासाठी निखळ आनंद आहे, जगण्याचं प्रयोजन आहे हे मी त्यांना पटवून दिलं. कधी कधी अत्यंत जवळच्या व्यक्तींचा होरा चुकू शकतो हे याचं एक उदाहरण.
केबीसी हे 25 वर्षांचं एक अद्भुत पर्व ठरलं. पण मला असं वाटतं, माझ्या निराशेच्या क्षणांनीदेखील मला पुन्हा उठून उभं राहण्याची शक्ती दिली. माझ्याकडे जेव्हा अगदीच काम नव्हतं, डोक्यावर नव्याने सुरू केलेल्या माझ्या कंपनीच्या (एबीसीएल) कर्जाचा डोंगर होता, कारण उत्पन्नाआधी मी योग्यतेपेक्षा अधिक पगार देऊन कंपनीत अधिकारी वर्ग नियुक्त केला होता. कंपनीचं आर्थिक नुकसान तर झालंच, पण मी कर्जात बुडालो. कारण कर्जाचे हफ्ते देण्यासाठी माझं वैयक्तिक उत्त्पन्न काहीच नव्हतं. शिल्लक संपली होती. दिवाळखोरीच्या उंबरठय़ावर मी उभा होतो. तेव्हा माझे शेजारी ज्येष्ठ सिनेनिर्माते यश चोप्रा यांना फोन करून मी भेटायला गेलो. त्यांना काम मागितलं आणि पुत्यांनी मला ‘मोहब्बतें’ हा चित्रपट दिला. त्यांचे मोठे उपकार ठरले माझ्यावर. ते वर्ष बहुधा 2000 असावं. या चित्रपटाला यश लाभलं, पण ‘मोहब्बतें’ करण्यापूर्वी मला असं सांगण्यात आलं, की यशजी यांचं विशेष सख्य शाहरुख खानशी आहे. ते त्याला पुत्रवत मानतात. त्यामुळे ‘मोहब्बतें’ करताना माझ्या व्यक्तिरेखेला ते व्यवस्थित न्याय देतील का? अशी शंका काहींनी उपस्थित केली. पण माझं मन द्विधा होण्यासाठी मी स्वतला सवड देणार नव्हतो. मला पुन्हा उभं राहायचं होतं. माझ्यावर झालेला कर्जाचा डोंगर फेडायचा होता. मी ‘मोहब्बतें’ आनंदाने स्वीकारला.
माँ आणि बाबूजी दोघेही माझ्या गाडीत मागच्या सीटवर बसले असताना मी स्वत गाडी ड्राइव्ह करत असताना काही प्रेक्षकांनी गाडीला घेरलं. जमलेल्या त्या पब्लिकमधून उलटसुलट प्रतिक्रिया येऊ लागल्या! ‘लंबू बडा बेकार अॅक्टर है!’ अशीदेखील दूषणं कानांवर आली. ‘अबे जाकर अॅक्टिंग सीख कर आ!’ कुणी तरी त्याच गर्दीतून शिव्या देऊ लागलं. त्या प्रसंगी मी शहारलो. माँ-बाबूजी यांच्यासमोर माझ्या इभ्रतीचे असे धिंडवडे निघणं माझ्यासाठी भयंकर लाजिरवाणं होतं. पण मी त्या जमावासमोर काहीच करू शकलो नाही. कशीबशी गाडी हमरस्त्यावर आणली. माँ-बाबूजी गाडीत असे बसले होते, जणू त्यांनी काहीच ऐकलं नाही. नंतरही त्यांनी काहीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. मुझ मे अभिनय करने की काबिलियत है यही वो मानकर चलते रहे!
याही प्रसंगाने मला शिकवलं की रसिक मनापासून प्रेम करतात तेव्हा अपमान, अपशब्दांची लाखोली वाहण्यास कमी करत नाहीत. यह पब्लिक है, यह सब जानती है. त्यांच्या हृदयात स्थान मिळवणं महाकठीण. तसंच हृदयातून पायउतार व्हायला क्षणाचाही विलंब लागत नाही याचा प्रत्यक्ष अनुभव मी घेतला. अशा पार्श्वभूमीवर त्याच सर्वसामान्य मायबाप प्रेक्षकांना मी दर रविवारी प्रेमाने सामोरा जातो. त्यांना माझ्या घराच्या आवारात उभं राहून नमस्कार करतो. त्यांचे प्रेम-आशीर्वाद घेतो. ही प्रेमाची ज्योत माझ्यासोबत कायम तेवत राहणार आहे आणि माझं नैतिक मनोबल वाराहणार आहे.