
हिंदुस्थानात आंतरराष्ट्रीय शाळांची संख्या वाढत आहे. एकेकाळी फक्त ‘एलायट क्लास’ची मुले इंटरनॅशनल बोर्डाच्या शाळांमध्ये शिक्षण घेत होती. मात्र आता मध्यमवर्गीयांचाही आंतरराष्ट्रीय शाळांकडे कल वाढत आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय शाळांच्या संख्येत हिंदुस्थान दुसऱया क्रमांकावर आहे. आयएएस रिसर्च ही संस्था जगभरातील इंटरनॅशनल स्कूलचा आढावा घेते. या संस्थेच्या माहितीनुसार, 2019 मध्ये हिंदुस्थानात 884 आंतरराष्ट्रीय शाळा होत्या. जानेवारी 2025 मध्ये ही संख्या 972 शाळा एवढी झाली. म्हणजे मागील पाच वर्षांत 10 टक्के वाढ झाली. जगभरात 14833 एवढय़ा आंतरराष्ट्रीय शाळा आहेत.