एमटीडीसीकडून महिलांना  50 टक्के सवलत

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत  महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने  राज्यातील महिला पर्यटकांना 1 ते 8 मार्च 2025 या कालावधीत एमटीडीसीच्या पर्यटक निवासांमध्ये  50 टक्के सवलत देण्याचा निर्णय  शुक्रवारी जाहीर केला. या सवलतीसह विविध पर्यटन उपक्रमदेखील राबविण्यात येणार आहेत. ‘आई’ पर्यटन धोरणांतर्गत हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.  1 ते 8 मार्च 2025 आणि वर्षभरातील इतर 22 दिवस असे एकूण 30 दिवस 50 टक्के सवलत असून या 22 दिवसांची माहिती एमटीडीसीच्या वेबसाईटवर जाहीर केली जाईल एमटीडीसीच्या पर्यटन स्थळांवर महिला बचत गटांसाठी स्टॉल्सची सुविधा दिली जाईल. महिला पर्यटकांसाठी विशेष साहसी आणि सांस्कृतिक उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. हेरिटेज वॉक, साहसी पर्यटन, शैक्षणिक सहली आणि पर्यटन मार्गदर्शन प्रशिक्षण. महिला गाईड्स आणि जल पर्यटन प्रशिक्षकांना संधी दिली जाईल.