
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स या महिन्याच्या अखेरीस पत्नी उषा व्हान्ससोबत हिंदुस्थानच्या दौऱ्यावर येणार असल्याचे वृत्त आहे. निर्यात शुल्कावरून अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने घेतलेली आक्रमक भूमिका यामुळे या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. जेडी व्हान्स यांची पत्नी उषा हिंदुस्थानी वंशाची असून ते दोघे तीन मुलांचे पालक आहेत. उषा यांचे आई-वडील 1970 च्या दशकात अमेरिकेत स्थलांतरित झाले. ‘सेकंड लेडी’ म्हणून उषा यांचा पहिलाच हिंदुस्थान दौरा असेल. लॉ स्कूलमध्ये शिकत असताना उषा आणि जेडी यांची भेट झाली होती.