
रशिया-युक्रेन युद्ध संपवण्यासाठी अमेरिका, युरोपीय देशांकडून केले जाणारे प्रयत्न फोल ठरत असून अजूनही हल्ल्यांची मालिका कायम आहे. सोमवारी रात्री रशियातील दहा विविध शहरांत 337 युक्रेनियन ड्रोन पाडल्याचा दावा रशियाच्या हवाई संरक्षण दलाने केला. गेल्या तीन वर्षांतील रशियावरील सर्वात मोठा हल्ला असल्याचे सांगण्यात आले. या हल्ल्यात एक ठार झाला तर निवासी इमारतींचे नुकसान झाले.
युक्रेनचे शिष्टमंडळ रशियाबरोबरचे युद्ध संपवण्यासाठी सौदी अरेबियातील अमेरिकेच्या मुत्सद्यांना भेटणार होते. अशातच युक्रेनने ड्रोन हल्ला केला. हल्ल्याबाबत युक्रेनने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. सर्वाधिक 126 ड्रोन सीमेपलीकडील कुर्स्क प्रदेशात पाडण्यात आले, तर राजधानी मॉस्को येथे जवळपास 91 ड्रोनचा पाडण्यात आले.