नेतन्याहू यांची खुर्ची धोक्यात; दोन सहकाऱ्यांना अटक

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या विरोधात रस्त्यावर आंदोलन सुरू असतानाच आता त्यांची खुर्ची धोक्यात आली आहे. कारण, त्यांच्या अत्यंत जवळचे मानल्या जाणाऱ्या दोघांना एका घोटाळ्यात पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी लवकरच नेतन्याहू यांचीही चौकशी होऊ शकते, असे वृत्त ‘द जेरूसलेम पोस्ट’ने दिले आहे.