दहशतवाद्यांचे सुरक्षित आश्रयस्थान असलेल्या पाकिस्तानातून कुख्यात दहशतवादी मसूद अझहरने 20 वर्षांनंतर पुन्हा एकदा हिंदुस्थानविरोधात गळ ओकली आहे. तसेच जिहाद छेडण्याची दर्पोक्तीही केली आहे. तसेच त्याने केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचीही निर्भत्सना केली आहे. सोशल मिडायावर त्याच्या या भाषणाबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
कुख्यात दहशतवादी आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरख्या मसूद अझहरने 20 वर्षांनंतर पहिल्यांदाच भाषण दिले आहे. त्यात त्याने हिंदुस्थान आणि इस्रायलच्या पंतप्रधानांची निर्भत्सना करत या दोन देशांविरोधात गरळ ओकली आहे.तसेच दोन्ही देशांविरोधात नव्याने जिहादी छेडण्याची दर्पोक्तीही त्याने केली आहे. मसूद अझहरने हे भाषण केव्हा आणि कुठे दिले, याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, या व्हिडीओचे वृत्त उघड झाल्याने पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर पुन्हा उघड झाला आहे. ‘द प्रिंट’ने याबाबतचे वृत्त दिले आहे.
भाषणादरम्यान अझहरने लोकांना दहशतवादी संघटनेत सामील होण्यासही सांगितले. यावेळी मसूद वेळोवेळी ‘ हिंदुस्थान तेरी मौत आ रही है’ असे फुत्कार सोडत होता. मसूद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत म्हणाला की “मला लाज वाटते की, मोदींसारखा कमकुवत माणूस आपल्याला आव्हान देतो. तसेच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याबाबत म्हणालाकी, नेतान्याहूसारखा उंदीर आपल्याला आव्हान देतो. या दोन देशांविरोधात जिहाद छेडण्याची दर्पोक्तीही तो करत होता.