पाच दिवसांत पाकिस्तानी सैन्यावर दुसरा हल्ला

बलूच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानच्या लष्करी ताफ्यावर हल्ला केला. हल्ल्यात 7 बस आणि दोन वाहनांना लक्ष्य करण्यात आले. एका बसला आयईडीने भरलेल्या वाहनाने धडक दिली. तर दुसऱ्या बसला रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेड्सने लक्ष्य करण्यात आले. पाच दिवसांत पाकिस्तानी सैन्यावर झालेला हा दुसरा हल्ला आहे.

काही तासांपूर्वी नोश्की येथील आरसीडी महामार्गावरील रख्शान मिलजवळ व्हीबीआयईडी फिदाई हल्ल्यात बलूच लिबरेशन आर्मीची युनिट, माजिद ब्रिगेडने कब्जा करणाऱ्या पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्याला लक्ष्य केले. या ताफ्यात आठ बस होत्या. त्यापैकी एक बस स्फोटात पूर्णपणे नष्ट झाल्याचा दावा बीएलएने केला आहे. दरम्यान, आत्मघाती हल्ल्यानंतरही बीएलएच्या फतेह पथकाने पाकिस्तानी सैन्याच्या ताफ्यात घुसून सैनिकांना ठार मारले, असेही बीएलएने म्हटले आहे.