जागतिक दहशतवाद निर्देशांकात पाकिस्तान दुसऱ्या क्रमांकावर

जागतिक दहशतवाद निर्देशांकात पाकिस्तान दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे सिडनी येथील इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स अ‍ॅण्ड पीसने जारी केलेल्या ग्लोबल टेररिझम इंडेक्स अहवाल 2025 मध्ये म्हटले आहे. पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तान हे सर्वाधिक दहशतवादग्रस्त क्षेत्रे आहेत. देशभरातील एकूण दहशतवादी घटनांपैकी 90 टक्के घटना याच भागात घडल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

गेल्या पाच दिवसात बलुच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानवर दोन हल्ले केले. चार दिवसांपुर्वी बीएलएने क्वेटाहून पेशावरला निघालेली संपूर्ण जाफर एक्स्प्रेस हायजॅक केली होती. त्यात 400 प्रवासी होते. ट्रेन बोगद्यात होती त्यावेळी बीएलएच्या बंडखोरांनी रेल्वे ट्रक बॉम्बस्फोट घडवून उडवला. रेल्वेतील तब्बल 214 प्रवाशांना बलुच आर्मीने ठार मारले. त्यानंतर आज पुन्हा बीएलएने पाकिस्तानच्या लष्करी ताफ्यावर हल्ला चढवला. रेल्वे हायजॅक केल्यानंतर बीएलएने पाकिस्तानला आपल्या राजकीय कैद्यांना सोडण्यासाठी 48 तासांची मुदत दिली होती. परंतु, पाकिस्तान सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्याने लष्कराच्या ताफ्यावर हल्ला चढवल्याचे बीएलएच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.