
न्यूझीलंडमध्ये राहायचंय का? मग तुमच्यासाठी न्यूझीलंडचा ऑक्टिव इन्व्हेस्टर प्लस व्हिसा 1 एप्रिलपासून खुला झाला आहे. न्यूझीलंड सरकारने परदेशी गुंतवणूक नियमांमध्ये बदल केले आहेत. गोल्डन व्हिसासाठी तीन वर्षांत 24.6 कोटींची गुंतवणूक करावी लागेल. इमिग्रेशन मंत्री एरिका स्टॅनफोड म्हणाल्या, ‘‘भू-राजकीय तणावामुळे श्रीमंत व्यक्ती परदेशाचा विचार करत आहेत. अनेक जण न्यूझीलंडकडे एक सुरक्षित, दीर्घकालीन पर्याय म्हणून पाहत आहेत. गोल्डन व्हिसासाठी जगभरातून चांगला प्रतिसाद मिळेल असे वाटते.
न्यूझीलंडचा ऑक्टिव्ह इन्व्हेस्टर प्लस व्हिसा आता दोन गुंतवणूक श्रेणींमध्ये आहे. ग्रोथ श्रेणीमध्ये तीन वर्षांत किमान 50 लाख न्यूझीलंड डॉलरची गुंतवणूक आवश्यक आहे. तसेच व्हिसाच्या कालावधीत गुंतवणूकदारांनी देशात किमान 21 दिवस घालवणे आवश्यक आहे. बॅलन्स श्रेणीत बाँड, स्टॉक, नवीन निवासी विकास किंवा विद्यमान व्यावसायिक किंवा औद्योगिक मालमत्तेत पाच वर्षांसाठी किमान 10 दशलक्ष न्यूझीलंड डॉलरची गुंतवणूक आवश्यक आहे.