
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये दुसऱ्या स्थानावर असलेले जेफ बेजोस यांची कंपनी ब्लू ऑरिजनचे नवीन शेफर्ड रॉकेट इतिहास रचण्यासाठी सज्ज झाले आहे. या रॉकेटचे हे 11 वे मानवी उड्डाण करण्यात येणार असून यावेळी या उड्डाणात केवळ महिला असणार आहेत. पुढील आठवड्यात म्हणजेच 14 एप्रिल रोजी वेस्ट टेक्सास येथून हे उड्डाण करण्यात येणार आहे. या मिशनचे नाव एनएस-31 असे आहे. या मिशनमध्ये कॅटी पेरी, आयशा बॉवे, अमांडा न्यगेन, गेल किंग, पॅरिन फ्लिन आणि लॉरेन सांचेज या सहा महिलांचा समावेश आहे. हे उड्डाण पृथ्वी आणि अंतराळदरम्यानच्या कार्मन रेषेपर्यंत जवळपास 10 मिनिटेपर्यंत असणार आहे.
कॅटी पेरी – कॅटी पेरी हॉलीवूडमधील लोकप्रिय गायिका आहे. कॅटी सामाजिक कार्यातसुद्धा अग्रेसर आहे. ती युनिसेफची सद्भावना दूत आहे. मुलांना सशक्त बनवण्यासाठी तिने फायरवर्क फाऊंडेशनची स्थापना केलीय. या मिशनद्वारे ती आपल्या मुलीला आणि अन्य छोट्या मुलांना स्वप्न साकार करण्यासाठी प्रेरित करण्याचे काम करते.
आयशा बॉवे – आयशा एक माजी रॉकेट वैज्ञानिक आहे. शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी ती कार्यरत आहे. स्टेबोर्डची सीईओ आणि लिंगोची संस्थापक आहे. तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी ती अंतराळ प्रवासावर जात आहे.
अमांडा न्यगेन – अमांडा एक बायोअॅस्ट्रोनॉटिक्सची शास्त्रज्ञ आहे. तिने नासाच्या अनेक मिशनमध्ये काम केलेले आहे. अमांडाला टाइम्स पत्रिकेच्या प्रतिष्ठत ‘वूमन ऑफ द इयर’ने सन्मानित करण्यात आलेले आहे. अंतराळात उड्डाण करणारी अमांडा पहिली व्हिएतनाममधील महिला ठरणार आहे.
गेल किंग – गेल किंग एक पुरस्कृत पत्रकार आहे. तसेच सीबीएस मॉर्निंची को-होस्ट आहे. अंतराळातला रोमांच अनुभवण्यासाठी ती फार इच्छुक आहे.
कॅरिन फ्लिन – फॅशनमधील मोठे नाव. चित्रपटनिर्मितीमधून सामाजिक बदल घडवण्यासाठी म्हणून ओळखली जाते. या उड्डाणात सहभागी होऊन कॅरिन मुलांना प्रोत्साहन देण्याचे काम करणार आहे.
लॉरेन सांचेज – एमी पुरस्कार विजेती पत्रकार आणि पायलट लॉरेन. अर्थ फंडची अध्यक्ष आहे.