
तंत्रज्ञानामध्ये जगाला मागे टाकणारा जपान देश सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. जपानमध्ये एक असं ठिकाण आहे तिथे लोक कुटुंब किंवा मित्र-मैत्रिणींसोबत राहत नाहीत तर बाहुल्यांसोबत राहतात.
तंत्रज्ञानात जपानने गरुडझेप घेतली असली तरी भावनिकदृष्ट्या मात्र संघर्ष करत आहे. जपानमध्ये वृद्धांची संख्या वाढत आहे. बरेच लोक लग्न करत नाहीत. यामुळे अनेक लोकांमध्ये एकटेपणाची समस्याही दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळेच एकटेपणा घालवण्यासाठी लोक बाहुल्यासोबत राहतात.
जपाननध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सोशल आयसोलोशनची समस्या निर्माण झाली आहे. याला हिकिकोमोरी म्हणतात. यामध्ये लोक नातेवाईक आणि समाजापासून वेगळे राहतात. लोक बाहुल्यांसोबत राहतात, बाहुल्यांसोबत फिरतात.
जपानमध्ये एक नागोरो गाव आहे. या गावातील लोकसंख्या 300 वरून फक्त 27 वर आली आहे. बाहुल्यांची संख्या 300 च्या आसपास आहे. अन्य एक गाव द हॅम्लेट ऑफ इचिनोनो येथे लोकसंख्या 60 आहे. या गावांतील लोक एकटेपणा दूर करण्यासाठी बाहुल्यांसोबत राहतात.