
रमजान ईदच्या दिवशीच इस्रायलने पॅलेस्टिनींच्या आनंदावर विरजण घातले. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धविराम करार निष्फळ ठरल्याच्या पार्श्वभूमीवर इस्रायलने राफा शहर सोडून जा अन्यथा परिणाम वाईट होतील, असा इशारावजा आदेश दिला. इस्रायल गाझा पट्टीवर पुन्हा हवाई आणि जमिनी हल्ले करण्याच्या तयारीत आहे.